तिसरा डोळा.....!!👁️📷
तिसरा डोळा.....!!👁️📷 स्वतःला जे आवडत तेच करावं आणि मी पण तेच करायचा निर्णय घेतलाय, #होय_फोटोग्राफर_होतोय. स्वतःचा #छंद जोपासतोय. एक दोन वर्षांपूर्वी #सोम्यान फुटुचं याड लावलं, अन #ज्योत्यांन बरचसं मार्गदर्शन केलं. पण त्यावेळी #फोटोग्राफर वगैरे व्हावं अशी मुळीच इच्छा नव्हती, पण काल जूनच्या महिना अखेरीस मी जॉब करत असलेल्या एका खाजगी संस्थेतुन #पगारवाढ या कारणास्तव #स्वईच्छेने_राजीनामा दिला, कारण #नोकरी फक्त रोजच्या आयुष्यातल्या #गरजापूर्ण करते #स्वप्न नाही. तशी माझी स्वप्ने कमीच होती तरी देखील तेवढ्यात ती पूर्ण होऊच शकत नव्हती. म्हणून मन #स्वतःचा_व्यवसाय करावा या विचाराकडे वळल आणि #हितचिंतक_मित्रांनी मार्गदर्शन केलं. शिवाय घरचे ही सपोर्टला खंबीरपणे उभे आहेत, आणि शेवट पर्यंत राहतीलच. व्यवसाय करावा तर कुठला तेव्ह वाटलं स्वतःचा छंद आणि आवडीची गोष्ट करावी मनातून आवाज आला #फोटोग्राफर, स्वतःचा छंदच व्यवसाय म्हणून केला तर आयुष्याचा प्रवास सुखकर होईल. छंद + आवड + व्यवसाय = यशस्वी आयुष्य x स्वप्न ...