Posts

Showing posts from September, 2018

चंद्र....!!🌛🌚

Image
चंद्र.....!!🌛🌚            कृत्रिम प्रकाशापुढं तुझ्या सौन्दर्याकडे आमची चुकून देखील नजर जात नाही, आणि तू #ग्राहनात सुद्धा स्वतःच सौदर्य लपवत नाही. कधी अर्धा असतोस तर कधी पूर्ण. अमावसाच्या रातील नेहमीच तुझी गरज जाणवते. चंद्राचं आणि माझं जवळच नातं हे अगदी माझ्या लहानपणा पासूनच आहे. लहान असताना वडिलांना रात्री घरी यायला उशीर होयचा, अगदी मध्य रात्र सुद्धा, त्यावेळी लाईटीची देखील नियमित वेळ नसायची. उन्हाळ्याच्या दिवसांत मग तीन भावंडे, आई आम्ही सारे घरासमोरील पटांगणात बसायचो संपूर्ण गाव चंद्राच्या मंद प्रकाशात न्हाऊन निघायचं. हळूचं आईचं गाणं सुरु व्हायचं. "पौर्णिमाच पडलं चांदणं ताई तुला आलं मागणं, आईचं ऐक सांगणं सासुशी नीट वागणं।" "पौर्णिमाच पडलं चांदणं ताई तुला आलं मागणं, वडिलांच ऐक सांगणं सासऱ्याशी नीट वागणं।" "पौर्णिमाच पडलं चांदणं ताई तुला आलं मागणं, भावाचं एक सांगणं दिराशी नीट वागणं।" "पौर्णिमाच पडलं चांदणं ताई तुला आलं मागणं, बहिणीचं एक सांगणं नंदाशी नीट वागणं।" मच्छर बॅकग्राउंड म्युझिक द्यायला तयारच असायचे. अशा छोट्याश्या गाण्यामार्फत आम...

आपलं बाप्पा......!!

Image
आपल बाप्पा.......!!           दहा दिवसांसाठी आलेले बाप्पा विसर्जना दिवशी वाजत गाजत मिरवणुकीने  "पुढच्या वर्षी लवकर येईल" असं सांगून जातात. पण जाता-जाता आपल्या सर्वातला "मीपणा" आणि "जातीभेद" कायमचा काढून जातात. हो हे सत्यय आणि हे जर जाणून घ्यायचं असेल तर कधी या वालवडला आणि बगा #तुळजा_भवानी_गणेश_मंडळाकड आपो-आप लक्षात येईल सगळं. या मंडळाच्या वतीने गेल्या #बावीस वर्षांपासून गणेश उत्सव साजरा केला जातो. विसर्जना दिवशी शिरा आणि भाताचा प्रसाद घरो-घरी पोहोच केला जातो. लहानापासून ते वयस्कर लोकांपर्यन्त उत्सवात मोठ्या प्रमाणात भाग घेतात. तुळजा भवानी नगर मध्ये तरुण वयातील मुलांची सांख्य सरासरी विस ते पंचवीसच्या जवळपास आहे. परंतु अश्चर्याची गोष्ठ अशी की या संखेत पंधरा मुलांची संख्या मुस्लिम समाजातील आहेत. यातील बऱ्याच जणांना श्रींची आरती देखील तोंडपाठ आहे.               सकाळची आरती असो किंवा संध्याकाळची आम्ही सर्व जण आरतीला हजरच. आरतीच ताट करणे, बाप्पाचा जय घोष, आरती नंतर चुर्मुऱ्याचा प्रसाद वाटप असो किंवा आरती होत असताना #घंटी वाजव...

लोककला.....!!

Image
#लोककला ....!!                   महाराष्ट्राच्या मातीत गेल्या कित्येक दशकापासून #_लोककला एक उत्सवाप्रमाणे साजरी केली जातेय. लोककलेमार्फत #समाजप्रबोधनकार , #अन्याय , #अत्याचार , #महिला_सशक्तीकरण , #शेतकऱ्यांची_व्यथा , #राजकारण्यांचा_डावपेच #सुनेचा_छळ असे अनेक विविध प्रकारचे #नाटकांचे सादरीकरण करून, समाजात वावरणाऱ्या #क्रूर लोकांची आणि अन्याय, अत्याचार सहन करणाऱ्यांची मानसिकता बदलून, मनात #संघर्षाची भावना निर्माण करण्याचे काम केले, आणि आज ही #जय_भवानी_नाट्य_मंडळ_वालवड Android च्या जमान्यात हि करत आहेत.                    YouTube वर Motivation चे विडिओ पाहून, ऐकून अंगात #स्फूर्ती , #ऊर्जा निर्माण होत नसते, जरी झाली तरी ती #तात्पुरत्या वेळासाठी असते. #कायमस्वरूपी #स्फूर्ती , #ऊर्जा आणि #अन्याय विरुद्ध लढण्याची #हिम्मत कोठून येत असेल तर ते फक्त स्टेजच्या १० ते १५ फूट अंतरावर बसून #Live_लोककला पाहण्यात...

वालवड आठवडी बाजार.....!!

Image
वालवड आठवडी बाजार....!!            "आई मला नवीन वही, पेन घ्यायचाय."            "बरं बबा घेऊ सोमवारी."             छोट्यातून छोटी वस्तू गावात भेटत जरी असली तरी सोमवारची वाट पाहून घ्यावी लागते. कारण आठवडा भर शेतात केलेल्या कामाचा मोबदला/रोजगार सोमवारी घर पोहच मिळतो. लोकांचा अंतर्गत देवाण-घेवाणीचा व्यवहार सोमवारीच पूर्ण केला जातो. गेल्या कित्येक वर्षांपासून माझं वालवड गाव सोमवारी मोठ्ठा आठवडी बाजारगाव म्हणून पंचक्रोशीत #प्रसिद्ध आहे. कदाचित #उस्मानाबाद जिल्ह्यात #जनावरांचा सर्वांत मोठा बाजार वालवड मध्ये भरत असेल. उस्मानाबाद, बीड, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यातील मोठ-मोठे व्यापारी बैल, गाय, म्हैस, शेळी खरेदी, विक्रीसाठी येतात. लाखो रुपयांची उलाढाल या दिवशी होते. जनावरांचा बाजार #आनंद_बागेत भरतो. शेळीचा सकाळी ०७:०० ते १०:३० पर्यन्त गेट नं. ०२ आणि बैल, गाय, म्हैस यांचा स्वतंत्र ओळीत गेट नं.०१ समोर भरतो. #बाजाराचे_वैशिष्ठ्ये म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या दुकानांची एक #स्वतंत्र_गल्ली आहे. भाजी-पाला, कापड ...

रानमळा स्वर्ग.....!!

Image
#रानमळा_स्वर्ग                  पावसाळ्यात पाऊस पडल्यानंतर ओढे, नदी, नाले तुडुंब भरून वाहतात, त्यांचा होणार खळखळ आवाज एकूण मन कसे एकदम प्रसन्न होते.             एकीकडून ऐकू येणार पक्षांचा किलबिलाट, गाई वासरांचा हबरडा, थंडगार वारा, हेलिकॅप्टर सारख्या किड्यांची गरगर, छोट्या कीटकांची अन्न ग्रहण करून उद्यासाठी राहिलेलं अन्न सुरक्षित आपल्या बिळा पर्यंत नेण्याची घाई, रंगीबेरंगी फुलपाखरांची एका फुलावरून दुसऱ्या फुलावर आणि दुसऱ्या फुलावरून तिसऱ्या फुलावर बसण्याची शैर्यत आणि अचानक एक फुलपाखरू नकळत पणे हातावर येऊन बसल्याचा आनंद तर काही वेगळाच आणि अशातच कोणाच्या तरी आठवणीत रमून जाणे....!!😍😍 खूप वेळ आठवणीत रमल्या नंतर आठवणीतून परतण्याची इच्छा नसताना हि, अचानक सूर्याने स्वतःला ढगातून बाहेर काढून त्याचा कडक सूर्यप्रकाश डोळ्यावर पाडून आठवणीतून बाहेर काढाव,😬😬 नंतर लक्ष जावं ते शेतातील डौलाने नाचत असणारे सूर्यफूल आणि तुर पिकांकडे, हे हिरवेगार पीक शेतकऱ्यांच्या मनाला थोडीशी अशा दाखवत उडिद आणि सोयाबीन पिकाचे झालेले नुकसान या...

जन्मदिनानिमित्त खाऊ वाटप.....!!

Image
#14_नोव्हेंबर_बालदिन...!!👶👶 #15_नोव्हेंबर_माझा_जन्मदिन...!!😎😎       आजपर्यंतच्या आयुष्यातील पहिलाच जन्मदिवस या चिमुकल्या जीवांसोबत साजरा केला. गेली काही वर्ष केक कापून, फटाकडे वाजवून, मित्रांना पार्टी देऊन, साजरा केला जायचा. पण आजच्या इतका आनंद यापूर्वी कधीच झाला नाही. लहान मुलांसाठी शेंगदानेचे लाडू जे कि पौष्टीक आहार मानला जातो. वाल्मीकेश्वर मंदिर शेजारील, वेशीतील आणि शाळे शेजारील अशा 3 अंगणवाडीत खाऊ वाटप केला. खाऊ वाटप करताना चिल्लरगॅंग एका जागेवर उभाचं राहत नव्हती, कोणी ईकड-तिकडं पळ, कोणी पाटीवर पेन्सिलने बाराखडी गिरव, कोणी दफ्तर आवरत होतं, तर कोणी आईच्या कुशीत जाऊन गुपचूप लाडू खात होतं. आणि काही निम्म्या रस्त्यात चालत होते. थंडीमुळे लहान मुलांची संख्या जरा कमीच होती.        मी ज्या अंगणवाडीत शिकलो त्या हि अंगणवाडीत खाऊ दिला आणि जाता-जाता ढगेबाईंना म्हटलो "मी पण याच अंगणवाडीत शिकलोय." हे एकताच ढगेबाईंनी पाठीवरून हात फिरवला. मन एकदम प्रसन्न झालं. पोर वाढदिवसानिमित्त खाऊ वटप् करायला आलेत असं कळाल कि कुलकर्णीबाईंनी पळत जाऊन बर्फी आणून मला शुभेच...

#वाडा.....!!

Image
#वाडा          वाडा म्हटलं की लगेच डोळ्यासमोर उभं राहत तो भला मोठा मुख्य दरवाजा, त्यामाघिल आगळ, ढाळज, ढाळजीतला झोका, चौक, 4-5 खनाची एक खोली,  चिरेबंदी दगडाच्या 3-4 फुटांच्या भिंती, त्या भिंतींना मातीने सारवून घेताना त्यामातीचा येणार सुगंध, तो सुगंध येताच पंचपक्वान सोडून तीच माती अगोदर चकावीशी वाटणारा तो मोह, मातीचा एक छोटासा ढिकुळ का होईना आपण अलगद जिभेवर ठेवतोच. स्वयंपाक घरातून ढाळजीत नजर  ठेवण्यासाठी असलेली एक छोटीशी खिडकी...!!👀  मोठ-मोठाले लाकडी खंबा तटस्थ उभा राहून माळवदाचे ओझे स्वतः जबाबदारीने अंगावर पेलताना गेल्या एक ते दिड शतक वर्षांपासून जसेच्या तसे दिसतात. अशा वाड्यातून खूप काही शिकायला मिळते.              चित्रात मारणावस्तेत जो वाडा दिसतोय ना तो आमचा वाडा आहे. त्याचे वय एक ते दीड शतक वर्षांच्या जवळपास असेल, पण सद्यस्थितीत बरीचशी पडझड झालेली आहे. आतमध्ये काय अवस्था झालेली असेल हे बाहेरूनच कळतेय. माझे वडील त्यांचे 6 भाऊ, (वाडीलासह 7 भाऊ) 3 बहिणी, आणि माझे सख्खे आणि चुलत भावंडाचे बालपण याच वाड्यात गेले...

वाट(रस्ता)

Image
#वाट (रस्ता)     वाटेला जेवढे महत्व रात्री होणाऱ्या प्रवासात असते ना, तेवढे दिवसा होणाऱ्या प्रवासात नसते. हे त्यालाच कळते जो रोज रात्री एकटा प्रवास करतो तो पण (फटफटी) मोटारसायकलीने, दिवसा किती हि खराब आणि 2-4 फूट खड्डा असलेला रास्ता रात्री हायवे असल्यागत भासतो, घरी लवकर पोहोचायच्या विचाराने, एकटा असल्याच्या भीतीपोटी गाडीचा वेग 70 च्या खाली येऊनच देत नाय, का काय माहित पण अशा परिस्थितीत गाडीच्या टायर खाली एक हि खड्डा येत नाही. असे भासते जणू तो रस्ता हि आपल्याला धिर, साथ देत सगळे खड्डेच गायब करतोय कि काय...??  लाल रंग जरी पुढे खतरा आहे असा ईशारा देत असला, तरी रात्रीच्या एकटेपणाच्या प्रवासात थोडासा आधार देत अस्तो.      काळोख रात्र मात्र खूप भयानक आणि घाबरून टाकणारे वेगवेगळे रूप दाखवते. रात किट्याची किरकिर, गाडीच्या प्रकाशाने रस्त्यात आडवे येणारे प्राणी, छोट छोटे किडे, मध्येच टिव टिव टिव टिव करणारी टिवटीवी काळजात धस्स करून जाते. आणि अचनाकच एकादी विचित्र सावली नजरेत पडावी मग काय अंगाचा पाणी-पाणीचं झालं म्हणून समजा. जस-जस आपलं गाव प्रकाश झोतातून उजळून दिसेल आणि...

दारी.....!!

Image
#दारी...!!💧         प्रत्येक रविवार प्रमाण आज हि सुट्टीनिम्मित अँप्पल बोर आणि डाळिंब चा अस्वाद घ्यायला सचिन मोहिते (अध्यक्ष) यांच्या शेतात मी आणि दत्ता गेलो. सुरुवातीला अँप्पल बोरच्या🍏🍏 बागेत जाऊन आख्या बागेत फिरून फिरून ढेकर येऊस्तर बोर खाल्ली त्यातच अधून मधून तुरीच्या शेंगा हि खायचो...!!🙆🙆 नंतर दत्ता म्हटला "अजिम चल जरा ब्रँण्ड चेंन्ज करू." मी पण म्हटलं "चालतंय कि." आतुलला( अध्यक्षांचा लहान भाऊ) 🙆🙆हाक देऊन शेजारीच असलेल्या डाळींबाच्या बागेत जाऊन एकदमच 10 ते 12 डाळिंब 🍎🍎 तोडून भारतीय बैठक मांडली. आपल्या आवडीचे फळ म्हटल्यावर  मग काय डाळिंबावर पण हाणला ताव...!! 😂😂😂 तेवढ्यात "आज्या" म्हणून कोणी तरी हाक दिली. आवाज ओळखीचा होता ते होते सचिनदादा.😍😍 दादा पुढं आलं आणि म्हटलं मी खाली होतो तुमचा आवाज आयकुन इकडं फिरलो. सचिनदादा धरत होते दारी गव्हाच्या शेतात. भिजलेल्या मातीचा सुगंध घेत आम्ही पाईप लाईनिवर तोंड, हात, पाय धुतल आणि निघालो जाता जाता एक फुटू घ्यावा म्हटलं तर अध्यक्ष लय लाम्ब गेलं आणि त्यांच्याकड जावं तर सगळं रान पाण्यानं भिजलेल लांबूनच फुटू ...

कहाणी सामूहिक विवाह सोहळा २०१७

Image
कहाणी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा २०१७ "उद्या विवाह सोहळा आहे, आणि आता चपात्या करायच्या आहेत.।" एवढं वाक्य बोलून फक्त शाळेकडील गल्लीत फिरून सांगितलं आणि बघता-बघता पोळपट, लाटणं, तेलासाठी वाटी हे स्वयंपाकासाठी लागणारं साहित्य स्वतःच्या घरातून घेऊन ८० ते ९० माता एका माघे एक स्वयंपाकासाठी निघाल्या. ०३ क्विंटलच्या चपात्या अवघ्या ०३ तास कालावधीच्या आतमध्ये तयार करून सर्व माता, भगिनी आप-आपल्या घरी पोहोचल्या. दिवसभर शेतात राबलेले हे हात थकलेले असतानाही अजिबात ढिले पडले नाही. एवढ्या कडाक्याच्या थंडीत पण हे हात पिठं, पोळपट, लाटणं आणि तेल यांच्याशी दोन हात करत, मऊ आणि सुबक चपाती तव्यावर लाल होईपर्यंत तळपत होत्या.😍😍 मध्येच कोणी एक माता माईक मध्ये गाणी म्हणतं होती आणि त्यांच्या सुरात-सूर मिसळून बाकीच्या माता त्यांना साद देत. यामध्ये ०३ क्विंटल पिठं कधी संपलं आणि चपात्यांन ०२ खॉट कधी गच्च भरले कळलंच नाही.....!!🤔🤔🤗🤗🤗 "का राबली असतील बरं हि #हातं....!!"🙌 (मला पडलेला प्रश्न🤓 अन लगेच मिळालेलं उत्तर) "ये पोरांनो लई चांगलं काम करताय बगा तुम्हीं तुमच्यामुळं एकाद्...

सूर्यस्की......!!🌞

Image
#सूर्यस्की....!!🌞 अविरत आणि अखंडपणे कितीतरी युगांपासुन तुझ हे उगवण सुरुच आहे....!!  काही केल तरच काहीतरी देईल या नियमा खाली चालणाऱ्या माणसांच्या जगाला तु काहीच न घेता इतक कस देऊ शकतोस..। लोकांना '#माणुसकी' आवडते पण समोरच्याकडून स्वतः कधी दाखवत नाही, मला तु आणि तुझी ही वृत्ती त्याहुन जास्त आवडते, असा शब्द नाहीये पण मी त्याला '#सूर्यस्की' म्हणेल....!! तुझ हे उगवण पाहुन मला उगवावस वाटतय "#निस्वार्थ" कार्यात या देहाला झिजवून दुसऱ्याला प्रकाशमय करावसं वाटतं...!! बाकी जीवनाच्या बँकेत डेबिट, क्रेडिट चे हिशेब चालुच राहतील पण काही कमवायची वेळ आलीच तर ही '#सूर्यस्की' कमवायला आवडेल मला....!! २०१७ सालच्या सुर्यास्ताला सलाम पण एक गोष्ठ फकस्त दिनदर्शिकेच पान बदलतंय "#सूर्यस्की" नाही...!! (या फोटोसाठी लय पळाव लागलंय राव..!!🤗🤗😂😂) दि.३१।डिसेंबर।२०१७ ©अजिम शफिक तांबोळी ✍️

सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न....!!

Image
दि. १२ जानेवारी २०१८ रोजी जिजाऊ जन्मोत्सव निमित्त सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला..!! दिप प्रज्वलन करून माँ.जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला. मराठा क्रांती मोर्चा राज्यव्यापी समिती सदस्या पूजाताई मोरे आणि प्रा.विशाल गरडसर यांनी शिवसंकल्प प्रतिष्ठान वालवडने आजपर्यंत केलेले सामाजिक उपक्रम वऱ्हाडी मंडळींसमोर मांडले त्यानंतर देवबाप्पा कडे माईक देऊन लग्न विधी पूर्ण करण्यास मुभा दिली. तीन जोडपे लग्नाच्या बंधनात जन्मोजन्मसाठी अडकली. स्वतः नावरदेवा सहित ५३ रक्तदात्यांनी आपल्या अनमोल रक्ताची आहुती दिली. नव वधु-वारांस शुभ आशीर्वाद देण्या करता. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले मा.सुजीतसिंह ठाकूर, संजय गाढवे, प्रतापसिंह पाटील, सुरेश कांबळे, मा. शहाजी चव्हाण, प्रवीण खटाळ, आदम शेख, दत्ता मोहिते, जालिंदर मोहिते, श्रीहरी बरस्कर दिग्गज राजकीय नेत्यांनी हि हजेरी लावली. त्याच बरोबर वऱ्हाडी मंडळींनी हि शुभ आशीर्वाद दिला. गेल्या दोन महिन्यांन पासून विवाह सोहळ्याची तयारी करत असलेले प्रतिष्ठानचे पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्या...

कष्टाची भाकर....!!

Image
#कष्टाची_भाकर.....!!🍪                 भाकर खावी तर #चुलीवरचीच ती पण गरम-गरम कडक पापुड्याची 😘😋 पण याच भाकरीसाठी दिवस रात्र आपल्या हाडाच पाणी होई पर्यंत झटतो, झगडतो, ४५℃ तापमान असलेल्या उन्हात रक्त जळे पर्यन्त राबराब-राबतो का...?? का, तर स्वतःची लहान-सहान मुलं भुकेनं व्याकुळ होऊ नये आपण उपाशी पोटी झोपलो तरी चालेल पण पोरानां पोट भर भाकर मिळावी याच साठी हि सारी जीवाची "आबदा" प्रत्येकाचे आई-वडील करत असतात....!!🙏🙏👇👇 दि.१७।जानेवारी।२०१८ © Ajim Shafik Tamboli ✍️

आयुष्याच गणित....!!

Image
मी आयुष्याच्या वाटेचा वारकरी, सुखात बहू, दुःखात कोणी न वाटेकरी......!! प्रकाशात तू, पण अंधारी न मज सावली, सुख - दुःख, अंधार - प्रकाश आयुष्याचे खरे परीक्षार्थी....!! दि.०४।फेब्रुवारी।२०१८ © AJIM SHAFIK TAMBOLI ✍️

हुर्डा....!!

Image
#हुर्डा........!!            हुर्डा हे नाव जरी आयकल तरी तोंडाला पाणी सुटत.😋😋 "मग कधी करायचं नियोजन." हे आपसूक निघणारं वाक्य. खरं तर हुर्डापार्टीचं नियोजन नव्हतंच पण शिराजभैयाच्या हट्टा खातीर हे नियोजन अचानकपणे अध्यक्षांच्या शेतात करायचं ठरवलं.(आमच्या पण मनातून होत पण फक्त नाव शिराजभैयाच केलं.😂😂😉😉) दुपारी ०३:०० चं नियोजन सायं ०५:०० ला जाऊन ठेपलं. पण आजच हुर्डा खायचा हे पक्क होत.(कारण मला रविवार शिवाय सुट्टी नसते.😂😂😂) आम्ही शेतात जाण्या अगोदरच सर्व तजबीज अध्यक्षांनी करून ठेवली. एक पोत, तळवट, गोवऱ्या, चटणी, आणि सर्वांत महत्त्वाचे हुर्ड्यात आलेली ज्वारीची कणसे, जणू अध्यक्षांसोबत हे हि आमचीच वाट पाहत होते.🤗🤗🤗        आम्ही पोहोचल्या सर-सर लगेचं गवऱ्या 🔥पेटवल्या, तेवढ्यात पिल्याला (तिथला लहान मुलगा) लिंबला एक छोटं 🐝मव्हाळ दिसलं त्याच बरोबर दत्ता एक पेटलेली गवरी हातात घेऊन झाडावर चढला काही वेळात तर मध घेऊन सर्वांच्या हातात प्रसादाप्रमाणं वाटू लागला.(मला तर लै थोडा दिलाय.😢😢)आणि दुसरीकडे लसलसीत 🔥हार पडलेला,...