#मैदान....!!🤼🏃⛹️

#मैदान....!!🤼🏃⛹️
            खो-खो, कबड्डी हे कुस्ती सारखाच महाराष्ट्राच्या मातीतला आणखीन एक खेळ जो अंतराष्ट्रीय स्तरावर खेळला जातो. याचा सराव शालेय जीवनातच करून घ्यावा लागतो. जवळ जवळ सर्वच शालेय विद्यार्थ्यांना सहा दिवसांच्या वेळापत्रकातील कमीत कमीत एक दिवसातील ००:४० मी. वेळ हा #शारीरिक_शिक्षणाच्या तासासाठी नमूद केलेला असतो. शाशीचा तास आहे म्हटलं की विद्यार्थी ज्याम खुश होऊन ओरडून आनंद व्यक्त करतात. दिवसभराच्या अभ्यासाने कंटाळा येतो म्हणून थोडासा #विरंगुळा व्हावा यासाठी हा तास दुपारच्या सत्रात ठेवला जातो, परंतु विषय, धडे, अभ्यासाचा भार जास्त असल्याने, या तासात पण दुसऱ्या विषयाचा अभ्यास शिकवला जातो. यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता खराब होते. त्यांची चीड-चीड वाढते.(स्वानुभव) जेवढे महत्व अभ्यासाला तेवढेच खेळाला पण दिले पाहिजे ज्यामुळे #अंगातील_चपळाई वाढते, #शरीर_लवचिक बनते. सदयाची #वास्तविकता पाहता, जेव्हा भी कधी शाळे समोरून जातो तेव्हा एक हि वर्ग मैदानातील खेळ खेळताना दिसत नाहीत. वर वर विद्यार्थ्यांची संख्या वाढत जरी असली, तरी शाळेसमोरील मैदानाची जागा कमी-कमी होताना दिसून येतेय. हि #शोकांतिका आहे.
            खर तर खो-खो, कबड्डी माझा खूप खूप आवडीचा खेळ शाळेत असताना खूपदा गुडघे फुटुस्तर खेळलोय पण ८वी. मध्ये जाऊस्तरच नंतर ९वी,१०वी त अभ्यासामुळे शिक्षकांनी #शारीरिक_शिक्षणाचा तास फक्त परीक्षा पुरताच मर्यादित ठेवला. तेव्हा पासून खेळ सुटला तो सुटलेलाच आहे. आज ही जेव्हा-जेव्हा कुठल्याही शाळेसमोरील खो-खो चे दोन खांब, कबड्डीचे आखलेले मैदान, रेषा पाहतो लगेच जाऊन खेळावंस वाटत आणि आज ही तसंच झालं, एकाठिकाणी प्रवासा दरम्यान मैदान पाहताच आम्ही दोघे खो-खो, कबड्डीप्रेमी मैदानात जाऊन,
"असं बसायचो, असा खांब मारायचो." 🏃
" सगळ्यात जास्त वेळा ताणून एकाच मुलीला सारखं सारखं आउट करायचो." 😜(कृपया नाव विचारू नका.😂😂)
"कचरे सरांची वाजलेले शिट्टी."📣
अशा अनेक एकमेकांच्या आठवणी संगायला लागलो.

विसरून पण कधी #न_विसरावे अशा या आठवणी......!!😊😊

दि.०५।ऑगस्ट।२०१८
© Ajim Shafik Tamboli🖋️

Comments

Popular posts from this blog

सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा २०२०

हुर्डा....!!

विचित्रगड/रोहिडा किल्ला भटकंती....!!