सूर्यस्की......!!🌞

#सूर्यस्की....!!🌞

अविरत आणि अखंडपणे कितीतरी युगांपासुन तुझ हे उगवण सुरुच आहे....!!  काही केल तरच काहीतरी देईल या नियमा खाली चालणाऱ्या माणसांच्या जगाला तु काहीच न घेता इतक कस देऊ शकतोस..। लोकांना '#माणुसकी' आवडते पण समोरच्याकडून स्वतः कधी दाखवत नाही, मला तु आणि तुझी ही वृत्ती त्याहुन जास्त आवडते, असा शब्द नाहीये पण मी त्याला '#सूर्यस्की' म्हणेल....!! तुझ हे उगवण पाहुन मला उगवावस वाटतय "#निस्वार्थ" कार्यात या देहाला झिजवून दुसऱ्याला प्रकाशमय करावसं वाटतं...!! बाकी जीवनाच्या बँकेत डेबिट, क्रेडिट चे हिशेब चालुच राहतील पण काही कमवायची वेळ आलीच तर ही '#सूर्यस्की' कमवायला आवडेल मला....!!

२०१७ सालच्या सुर्यास्ताला सलाम पण एक गोष्ठ फकस्त दिनदर्शिकेच पान बदलतंय "#सूर्यस्की" नाही...!!
(या फोटोसाठी लय पळाव लागलंय राव..!!🤗🤗😂😂)

दि.३१।डिसेंबर।२०१७
©अजिम शफिक तांबोळी ✍️


Comments

Popular posts from this blog

सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा २०२०

हुर्डा....!!

विचित्रगड/रोहिडा किल्ला भटकंती....!!