#उजेड....!!
मशाल, कंदील, चिमणी, मेणबत्ती हे दुसऱ्याला प्रकाश देण्यासाठी स्वतः जळून राख बनतात आणि जो पर्यंत #अंगाचा प्रत्येक भाग #राख बनत नाही तोपर्यंत #मंद का होईना पण #उजेड देऊन जातात.
"दुसऱ्याला प्रकाशमय करण्यासाठी स्वतःला जळाव लागतं, आणि ते हि स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होऊ न देता." सध्या स्थितीला #जळण्यातला फक्त एकच प्रकार जास्त दिसून पण येतो आणि त्याच्याकडे आपली नजर पडताच त्याच्या अस्तित्वाच्या #कमतरतेची जाणीव पण होते. #एकमेकांच्या_प्रगतीवरती_जळणे हा प्रकार आजकाल सर्वांत जास्त प्रमाणात दिसून येतो. मशाल, कंदील, चिमणी, मेणबत्ती यांचं जळण #अंधारात #वाट दाखवण्याची कामे करतात, आणि ते हि स्वतः #पाया_खाली अंधार ठेऊन, आणि #प्रगतीवर_जळणारे चष्मा न घालता पण स्पष्ठ दिसणाऱ्या #उजेडात पण #वाट_लावण्याची.
पर्वाच्या अवकाळी पावसाने वादळ वाऱ्याच्या झपाट्यानं बरीचशी झाडे, झुडपे #जमीनधोस्त झाली, त्यामुळे विजेच्या खांबावरचे #तारा तुटून अंधारात #मच्छरांची_मेजवानी बनत #निजलेल्या गावाकडे #अर्ध्यावर्ती झोका #खेळात पाहत होत्या. तर दुसऱ्या बाजूला घराच्या एका #कोपऱ्यात कंदील, चिमणी आणि मेणबत्ती यांच्यापैकी एक जण संपूर्ण खोली आपल्या प्रकाशाच्या लखलखाटाने #सुवर्ण_मंदिराची शोभा आणून देत होती. यांच्या अस्तित्वाची जाणीव कोणालाच होत नव्हती, तरी पण त्या जळतच होत्या. शेवटी एवढं सांगावसं वाटतं,
|| मरावे परी किर्तिरुपे उरावे.||
दि.२९।मे।२०१८
© Ajim Shafik Tamboli ✍️
Comments
Post a Comment