दारी.....!!

#दारी...!!💧
        प्रत्येक रविवार प्रमाण आज हि सुट्टीनिम्मित अँप्पल बोर आणि डाळिंब चा अस्वाद घ्यायला सचिन मोहिते (अध्यक्ष) यांच्या शेतात मी आणि दत्ता गेलो. सुरुवातीला अँप्पल बोरच्या🍏🍏 बागेत जाऊन आख्या बागेत फिरून फिरून ढेकर येऊस्तर बोर खाल्ली त्यातच अधून मधून तुरीच्या शेंगा हि खायचो...!!🙆🙆 नंतर दत्ता म्हटला "अजिम चल जरा ब्रँण्ड चेंन्ज करू." मी पण म्हटलं "चालतंय कि." आतुलला( अध्यक्षांचा लहान भाऊ) 🙆🙆हाक देऊन शेजारीच असलेल्या डाळींबाच्या बागेत जाऊन एकदमच 10 ते 12 डाळिंब 🍎🍎 तोडून भारतीय बैठक मांडली. आपल्या आवडीचे फळ म्हटल्यावर  मग काय डाळिंबावर पण हाणला ताव...!! 😂😂😂 तेवढ्यात "आज्या" म्हणून कोणी तरी हाक दिली. आवाज ओळखीचा होता ते होते सचिनदादा.😍😍 दादा पुढं आलं आणि म्हटलं मी खाली होतो तुमचा आवाज आयकुन इकडं फिरलो. सचिनदादा धरत होते दारी गव्हाच्या शेतात. भिजलेल्या मातीचा सुगंध घेत आम्ही पाईप लाईनिवर तोंड, हात, पाय धुतल आणि निघालो जाता जाता एक फुटू घ्यावा म्हटलं तर अध्यक्ष लय लाम्ब गेलं आणि त्यांच्याकड जावं तर सगळं रान पाण्यानं भिजलेल लांबूनच फुटू काढला पण हे सगळं पाहताना मला माझे 11 वी चे दिवस आठवले.
            11 वि त प्रवेश घेतला, पण नियमित कॉलेज करत नव्हतो. त्यावेळी आमच्या शेतात पळाटी(कापूस) लावला होता आणि मी दारी धरायला जायचो, शेतात काम करत करत मजा हि खूप घ्यायचो. पाटात पाणी सोडले कि पाटातल्या कोरड्या मातीत जाऊन उभं राहायचो. कोरडी माती भिजताना जो सुगधं येतो तो सुगधं आजच्या काळात जे बॉडीस्प्रे फॉग,वैगरेना पण मागे टाकणारा आहे. कोरड्या मातीत उभं राहिलं कि पाया खालची माती भिजताना तळ पायाला होणाच्या गुदगुल्याने मिळणार आनंद तर लै मंजी लै भारी अस्तोय. वाफा भरुस्तर चिखलाच्या गोळ्यानं येडी-वाकडी मूर्ती तयार करायची आणि ती कुठं तर बांधाच्या एका जागेवर ठेवायची. यातच पूर्ण दिवसाचं दारे देणं कस संपायच तेच कळत नव्हतं. तो दिवस आहे आणि आजचा दिवस पूर्ण 6 वर्ष झालं शेतात दारी धरलेली. दिवस कसे बदलतात ना....!!

#अनमोल_क्षणांचा_ठेवा.....!!😍😘🙏🙏

दि.०१।डिसेंबर।२०१७
© Ajim Shafik Tamboli✍️


Comments

Popular posts from this blog

सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा २०२०

हुर्डा....!!

विचित्रगड/रोहिडा किल्ला भटकंती....!!