Posts

Showing posts from November, 2019

"गावाकडं करमत नाय लका आज काल"

Image
"गावाकडं करमत नाय लका आज काल" "का रं" "पुण्याची सवय लागलीय ना म्हणून" "होय लका तस हाय" "गावाकडं कधी जाऊ असं होतं, पण गावात आलं की पहिल्या एक दोन दिवस बरं वाटतं पण नंतर नंतर करमतच नाही, बोर हुतं राव" "सवय नाही ना म्हणून अस हुतं, आमला काय सवय झालीय गावाची काय वाटत नाही"        पुणे, मुंबई, कोल्हापूर, अश्या मोठं मोठ्या शहरातून दिवाळीनिमित्त गावाकडं येणाऱ्या प्रत्येक लोकांची अशी भावनामुद्रा आपुन पाहतोच. तिकडं मोठं मोठ्या इमारती, हायफाय सोसायटीज, हायफाय दुकान, हाटेल, स्टँडर्ड राहणारी लोक, या सगळ्या गोष्टी पुढं गाव ते गावच ना. 😢 गावात तिचं जुनी शेणान सारवलेली निम्मी पडलेली घर, छोट्याश्या खोपऱ्यातली दुकान, अवती भोवती गिरगिरणाऱ्या माश्या अस्वच्छ हाटेल, पारावर साधी भोळी गप्पा मारत बसलेली माणसं. गावात करमणुकीच काहीच साधन उपलब्द नासतंय, ना गार्डन अस्तय, ना मॉल, ना पिच्चरची टाकी.         गावतल्या प्रत्येकाने आयुष्याचे कमीत कमीत १६ वर्ष तरी गावात घालवलेले असतेच, पण शिक्षणाच्या उद्देशाने बाहेर गावी एक महिना जरी राहून आला ना तरी त्य...