Posts

Showing posts from 2019

"गावाकडं करमत नाय लका आज काल"

Image
"गावाकडं करमत नाय लका आज काल" "का रं" "पुण्याची सवय लागलीय ना म्हणून" "होय लका तस हाय" "गावाकडं कधी जाऊ असं होतं, पण गावात आलं की पहिल्या एक दोन दिवस बरं वाटतं पण नंतर नंतर करमतच नाही, बोर हुतं राव" "सवय नाही ना म्हणून अस हुतं, आमला काय सवय झालीय गावाची काय वाटत नाही"        पुणे, मुंबई, कोल्हापूर, अश्या मोठं मोठ्या शहरातून दिवाळीनिमित्त गावाकडं येणाऱ्या प्रत्येक लोकांची अशी भावनामुद्रा आपुन पाहतोच. तिकडं मोठं मोठ्या इमारती, हायफाय सोसायटीज, हायफाय दुकान, हाटेल, स्टँडर्ड राहणारी लोक, या सगळ्या गोष्टी पुढं गाव ते गावच ना. 😢 गावात तिचं जुनी शेणान सारवलेली निम्मी पडलेली घर, छोट्याश्या खोपऱ्यातली दुकान, अवती भोवती गिरगिरणाऱ्या माश्या अस्वच्छ हाटेल, पारावर साधी भोळी गप्पा मारत बसलेली माणसं. गावात करमणुकीच काहीच साधन उपलब्द नासतंय, ना गार्डन अस्तय, ना मॉल, ना पिच्चरची टाकी.         गावतल्या प्रत्येकाने आयुष्याचे कमीत कमीत १६ वर्ष तरी गावात घालवलेले असतेच, पण शिक्षणाच्या उद्देशाने बाहेर गावी एक महिना जरी राहून आला ना तरी त्य...

वालवड बाजारपेठ....!!😊😊

Image
वालवड बाजारपेठ.....!!😊              बाजाराच्या दृष्टीने उस्मानाबाद जिल्ह्यातील अत्यंत महत्वाच किंवा जिल्ह्यातील नंबर एकच गाव. आख्ख्या उस्मानाबाद जिल्ह्यात जनावरांचा सर्वांत मोठा बाजार वालवडमध्ये दर सोमवारी भरतो. लाखो रुपयांची उलाढाल या दिवशी होते. त्याच बरोबर ग्रामपंचायतची हि उलाढाल याच पटीत आहे. स्टँडवरच ग्रामपंचायत कार्यालयाची डबल मजली सुसज्ज ईमारत गावाला आणखी शोभा आणते. ग्रामपंचायतीच्या मालकी हक्काचे ४८ गाळे आणि ८ ते १० एकर बाजारासाठी खुली जागा, ५० टपऱ्या आणि ४० नागरिकांच्या स्वतःच्या मालकीचे गाळ्यांची भर देखील उद्योग-धंद्यात पडली. वालवडसारखा बाजार आपल्या गावात देखील भरावा यासाठी काही शेजारील गावानी अनेक प्रयत्न केले, पण वालवडचा बाजार मोडणे अशक्यच....!!                    श्री वाल्मीकेश्वर जागृत देवस्थान वालवडला लाभले, त्याच मंदिरासमोर २००० लोक मावतेल एवढे भले मोठे सांस्कृतिक सभागृह उभारण्यात आलेले आहे. पाच मंदिर, एक मस्जिद आणि तीन दर्गा विविधतेत एकता दिसून येते. गावातील ८०% तरुण व्यसनापासून...

शेतकऱ्यांची फौज....!!

Image
शेतकऱ्यांची फौज....!!              हम्ब्याssssssss              हम्ब्याssssssss            हंबरण्याचा अलार्म ऐकू आला कि नचुकता किंवा नियमित वेळेत उठून पहिलं आपल्या #जित्राबाचा गोठा गाठणार शेतकरी किती काष्ठाळू आणि प्रेमळ असतो हे घर बसल्या खुर्चीवर आयता गरमा-गरम चहा, दूध, कॉफी पिताना कधीच लक्षात येणार नाही. तांबडं फुटायच्या अगोदरच त्यांची दिवसाच्या कामाची सुरुवात होते. गाई, म्हशींची धार (दूध) काढायची, मोकळ्या हवेत बांधायची, वैरण, पाणी करायची, गोठा साफ करायचा  च्या पिऊन रतीबाची दूध घरपोच करायची. चलता-चलता बाजारातल्या गप्पा ऐकायच्या अन मग घरी येऊन, गरम-गरम #न्यारी करून. एका फाटक्या चिंधीत दुपारची भाकर घ्यायची अन जित्राबा घेऊन #तडक शेतात निघायचं. हिंस्त्र प्राण्यांपासून जित्राबाच संरक्षण व्हावं यासाठी #कुत्र्याला सोबत घेऊन माळ रानात आपली अन आपल्या जनावरांची  पोटाची खळगी भरण्यासाठी फिरणारे कित्येक शेतकरी आपण रोज पाहतो.           पावसाळयात जेव्हा जोराचा ...

दरोडा....!!

Image
#दरोडा.....!!                 आज तब्बल आठ घर लुटून, हजारो मधमाश्याना बेघर केलं, परंतु त्या मधमाश्यानी हार न मानता पुन्हा तात्काळ त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवर आपल घर बनवायला सुरुवात केली. कारण संघर्ष इथं कधीच संपत नाही. सभोवतालच्या निसर्गात अनंत प्राणी, पक्षी वावरतात ज्यांना संघर्षाचे धडे आईच्या उदरातच मिळतात. हिसकावून खाणं आणि आपल्या हातातलं हिसकावल तर युद्ध करून ते परत मिळवण्याचा प्रयत्न करणे, नाहीच तर पुन्हा नव्याने सुरुवात. नदी, ओढा, नाला, झाड-झुडपं, बांध, या सगळ्यातून पायपीट केली तेव्हा पाच जण पाच #मव्हाळ घेऊन आलो. तीन जाग्यावरच फोडली. बाकी मी ओझ्यानच मेलो पाणी बॉटल,  शेणाचीगौरी, कोयता, आणि छोटी बकेट "अर्रर्रर्रर्र इथं एक मव्हाळ हाय, लय मोठय या लवकर." बाबा ओरडला कि हे सगळं एका हातात सांभाळून नेणं लै अवघड, कारण दुसऱ्या हातात एक मव्हाळ होतं.             दत्ता, सचिनदादा, बाबा, अन नंदू झाडावर चडून गौरीच्या(शेणाची) धुराद्वारे मधमाश्याना उठवून #मध अलगद खाली घेऊन येत होते, आणि त्याच बरोबर "कांदा (मध) कमीचंय जरा...