वालवड बाजारपेठ....!!😊😊

वालवड बाजारपेठ.....!!😊

             बाजाराच्या दृष्टीने उस्मानाबाद जिल्ह्यातील अत्यंत महत्वाच किंवा जिल्ह्यातील नंबर एकच गाव. आख्ख्या उस्मानाबाद जिल्ह्यात जनावरांचा सर्वांत मोठा बाजार वालवडमध्ये दर सोमवारी भरतो. लाखो रुपयांची उलाढाल या दिवशी होते. त्याच बरोबर ग्रामपंचायतची हि उलाढाल याच पटीत आहे. स्टँडवरच ग्रामपंचायत कार्यालयाची डबल मजली सुसज्ज ईमारत गावाला आणखी शोभा आणते. ग्रामपंचायतीच्या मालकी हक्काचे ४८ गाळे आणि ८ ते १० एकर बाजारासाठी खुली जागा, ५० टपऱ्या आणि ४० नागरिकांच्या स्वतःच्या मालकीचे गाळ्यांची भर देखील उद्योग-धंद्यात पडली. वालवडसारखा बाजार आपल्या गावात देखील भरावा यासाठी काही शेजारील गावानी अनेक प्रयत्न केले, पण वालवडचा बाजार मोडणे अशक्यच....!!
                   श्री वाल्मीकेश्वर जागृत देवस्थान वालवडला लाभले, त्याच मंदिरासमोर २००० लोक मावतेल एवढे भले मोठे सांस्कृतिक सभागृह उभारण्यात आलेले आहे. पाच मंदिर, एक मस्जिद आणि तीन दर्गा विविधतेत एकता दिसून येते. गावातील ८०% तरुण व्यसनापासून दूर आहे, करण प्रत्येक तरुण हा कुठल्या न कुठल्या सामाजिक काम करणाऱ्या संस्थेचा पदाधिकारी आहे, त्यामुळे त्याला समाजाविषयी चांगलीच जाणीव दिसून येते. भविष्यात जेव्हा हेच तरुणवर्ग गावातल्या राजकारणात प्रवेश करतील तेव्हा कदाचित वालवड संपूर्ण महाराष्ट्रात नावारूपाला येईल याची खात्री सर्वांनाच आहे. जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टीने वालवड सर्कलवर प्रत्येक पुढाऱ्यांची करडी नजर असती.  

सध्या पीक विमा भरण्याचा सिजन चालुय आजूबाजूच्या गावाचे सर्वच शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दिवसभर रांग लाऊन उभेत आणि माझ्यासमोर तासापूर्वी १० पेक्षा हि ज्यास लोक रांगेत आणि फॉर्म त्याही पेक्षा दुप्पट होते, आता ही तेवढेच आहेत तवर काय करावं म्हणून बसल्या-बसल्या हा लेखनप्रपंच....!!
😊😊🙏🙏

Ajim Shafik Tamboli✍️
दि.२१।जुलै।२०१९

Comments

Popular posts from this blog

सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा २०२०

हुर्डा....!!

विचित्रगड/रोहिडा किल्ला भटकंती....!!