Posts

Showing posts from November, 2018

धाराशिव लेणी...!!

Image
धाराशिव लेणी.....!!              उस्मानाबाद शहापासून ९ ते १० किमी अंतरावर आहेत हे ठाऊक होत, पण लेण्यापर्यंत पोहचण्यासाठी नेमकी वाट कोणती जाती हे माहित नव्हतं. हातलाई देवी मंदिराच्या परिसरात असेल असा माझा प्राथमिक अंदाज होता. मंदिराच्या आवारात पोहचून लेण्यांकडे जाण्याचा दिशादर्शक फलक हुडकू लाहलो पण कुठंच दिसेना. Google Map वाल्याला विचारलं तर लेण्यांकडे जाण्याचा मार्ग उस्मानाबाद शहरातून बार्शी नाक्यावरून उजव्या हाताला टर्न हाणून सरळ निघा असं उत्तर मिळालं. KNG CB Shine गाडीचं स्विच बंद करून ६० च्या स्पीडने हातलाई देवीचा डोंगर उतरू लागलो, आणि सांगितल्या प्रमाणे लेण्यापर्यंत पोहोचलो.                ३० ते ३५ पायऱ्या उतरून पहिल्या लेणीच्या मुखाशी असलेला अक्षर पुसलेला माहितीचा फलक वाचून पाय लेण्यांकडे वळाले आणि डोळे थक्क झाले, कारण लेण्यांचा प्रकार मी पहिल्यांदाच पाहत होतो. एकाच मोठ्या डोंगरात तीन वेगवेगळ्या लेण्या कोरलेल्या आहेत. सम्पूर्ण डोंगराचा भार डोक्यावर घेऊन उभे असलेले भले मोठ्ठाले स्तंभ, पाषाण दगडाची भिंत त्...

परंडा किल्ला।

Image
परंडा_किल्ला ....!!                   उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा शहरात हा भूईकोट किल्ला असून शहराच्या मधोमध स्थिर आहे.कल्याणीच्या चालुक्याच्या काळात परिंडा (परंडा) हा एक महत्वाचा परगणा बहामनी राजवटीत मुहमदशहा बहामनीचा पंतप्रधान महमूद गवान याने तो बांधला. हा किल्ला ३५ मिटर लांब व तेवढाच रुंद आहे. इ.स. १६०० च्या सुमारास हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर १६२८ साली  #शहाजीराजांनी  तो ताब्यात घेतला व दोन वर्षे तो त्यांच्या ताब्यात होता. इ.स. १६३० मध्ये तो विजापूरच्या आदिलशाकडे गेला आणि कायम त्याच्यात ताब्यात तो राहिला. त्यांच्याच मुरार नावाच्या सेनापतीने या किल्ल्यातील प्रसिद्ध  #मुलुखमैदान_तोफ  १६३२ साली विजापूर येथे नेली.यासोबतच किल्ल्यात अजदा पईकर नावाचीही तोफ आहे. त्यामध्ये २ ते ३ तोफा इंग्रजांनी तयार केलेल्या असाव्या कारण त्यावरती इस्ट कंपनीचा लोगो आहे. आज हि या किल्ल्यात १५ ते २० तोफा धूळखात पडलेल्या आहेत.           ...