धाराशिव लेणी...!!

धाराशिव लेणी.....!!
             उस्मानाबाद शहापासून ९ ते १० किमी अंतरावर आहेत हे ठाऊक होत, पण लेण्यापर्यंत पोहचण्यासाठी नेमकी वाट कोणती जाती हे माहित नव्हतं. हातलाई देवी मंदिराच्या परिसरात असेल असा माझा प्राथमिक अंदाज होता. मंदिराच्या आवारात पोहचून लेण्यांकडे जाण्याचा दिशादर्शक फलक हुडकू लाहलो पण कुठंच दिसेना. Google Map वाल्याला विचारलं तर लेण्यांकडे जाण्याचा मार्ग उस्मानाबाद शहरातून बार्शी नाक्यावरून उजव्या हाताला टर्न हाणून सरळ निघा असं उत्तर मिळालं. KNG CB Shine गाडीचं स्विच बंद करून ६० च्या स्पीडने हातलाई देवीचा डोंगर उतरू लागलो, आणि सांगितल्या प्रमाणे लेण्यापर्यंत पोहोचलो.
               ३० ते ३५ पायऱ्या उतरून पहिल्या लेणीच्या मुखाशी असलेला अक्षर पुसलेला माहितीचा फलक वाचून पाय लेण्यांकडे वळाले आणि डोळे थक्क झाले, कारण लेण्यांचा प्रकार मी पहिल्यांदाच पाहत होतो. एकाच मोठ्या डोंगरात तीन वेगवेगळ्या लेण्या कोरलेल्या आहेत. सम्पूर्ण डोंगराचा भार डोक्यावर घेऊन उभे असलेले भले मोठ्ठाले स्तंभ, पाषाण दगडाची भिंत त्यामध्ये कोरलेले द्वार, खिडक्या त्यावरील नक्षीचे कोरीव काम खूपच सुंदर. तिसऱ्या लेणीत महावीरांची सदारणता ६ फूट उंचीची मूर्ती आणि त्यातच पाच फन असलेल्या नागराजचे वरून छत्र, बाजूने असुरांच्या कोरीव मूर्तीचा हि समावेश आहे. एका लोखंडी दरवाजाच्या आत हि मूर्ती सुस्थितीत आहे. आणखी लहान मूर्त्याही आजूबाजूच्या खोलीत आहेत. तसेच काही आयात आकृती दगडात कोरलेली मूर्ती अस्थव्यस्त पडलेल्या दिसून येतात.
                   तसेच समोर एक महादेवाचे प्राचीन मंदिर देखील आहे. जो कि स्थापत्यचा अप्रतिम नमुना पाहायला मिळतो. मंदिराचे सर्व दरवाजे बंद केले तर संपूर्ण मंदिरात अंधार पडला तरी आतील शिवलिंग प्रकाशमय राहतो. मंदिराच्या समोरील दरवाजाच्या वरच्या भागावर एक छोटिशी खिडकी ठेवण्यात आली आहे, त्यामुळं त्या खिसकीतून येणार प्रकाश सरळ शिवलिंगावर पडतो. सकाळची सूर्यकिरणे शिवलिंगावर पाडावी या उद्धेषाने हि खिडकी ठेवण्यात आली असावी. मंदिराच्या कळसावर हि कोरीव काम करण्यात आले आहे. संवर्धन नसल्यामुळे पर्यटकांचा ओघ खूपच कमीय त्यामुळे भयाण शांतता पसरलेली असते. याचमुळे हि लेणी लोकांपासून अलिप्त होत चालीय. गाडी नाळदुर्ग किल्ल्याच्या दिशेने धावत असताना सोमाची आणि माझी या विषयावर चर्चा रंगली.

दि.११।नोव्हेंबर।२०१८
©Ajim Shafik Tamboli🖋️















Comments

Popular posts from this blog

सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा २०२०

हुर्डा....!!

विचित्रगड/रोहिडा किल्ला भटकंती....!!