Posts

Showing posts from 2018

धाराशिव लेणी...!!

Image
धाराशिव लेणी.....!!              उस्मानाबाद शहापासून ९ ते १० किमी अंतरावर आहेत हे ठाऊक होत, पण लेण्यापर्यंत पोहचण्यासाठी नेमकी वाट कोणती जाती हे माहित नव्हतं. हातलाई देवी मंदिराच्या परिसरात असेल असा माझा प्राथमिक अंदाज होता. मंदिराच्या आवारात पोहचून लेण्यांकडे जाण्याचा दिशादर्शक फलक हुडकू लाहलो पण कुठंच दिसेना. Google Map वाल्याला विचारलं तर लेण्यांकडे जाण्याचा मार्ग उस्मानाबाद शहरातून बार्शी नाक्यावरून उजव्या हाताला टर्न हाणून सरळ निघा असं उत्तर मिळालं. KNG CB Shine गाडीचं स्विच बंद करून ६० च्या स्पीडने हातलाई देवीचा डोंगर उतरू लागलो, आणि सांगितल्या प्रमाणे लेण्यापर्यंत पोहोचलो.                ३० ते ३५ पायऱ्या उतरून पहिल्या लेणीच्या मुखाशी असलेला अक्षर पुसलेला माहितीचा फलक वाचून पाय लेण्यांकडे वळाले आणि डोळे थक्क झाले, कारण लेण्यांचा प्रकार मी पहिल्यांदाच पाहत होतो. एकाच मोठ्या डोंगरात तीन वेगवेगळ्या लेण्या कोरलेल्या आहेत. सम्पूर्ण डोंगराचा भार डोक्यावर घेऊन उभे असलेले भले मोठ्ठाले स्तंभ, पाषाण दगडाची भिंत त्...

परंडा किल्ला।

Image
परंडा_किल्ला ....!!                   उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा शहरात हा भूईकोट किल्ला असून शहराच्या मधोमध स्थिर आहे.कल्याणीच्या चालुक्याच्या काळात परिंडा (परंडा) हा एक महत्वाचा परगणा बहामनी राजवटीत मुहमदशहा बहामनीचा पंतप्रधान महमूद गवान याने तो बांधला. हा किल्ला ३५ मिटर लांब व तेवढाच रुंद आहे. इ.स. १६०० च्या सुमारास हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर १६२८ साली  #शहाजीराजांनी  तो ताब्यात घेतला व दोन वर्षे तो त्यांच्या ताब्यात होता. इ.स. १६३० मध्ये तो विजापूरच्या आदिलशाकडे गेला आणि कायम त्याच्यात ताब्यात तो राहिला. त्यांच्याच मुरार नावाच्या सेनापतीने या किल्ल्यातील प्रसिद्ध  #मुलुखमैदान_तोफ  १६३२ साली विजापूर येथे नेली.यासोबतच किल्ल्यात अजदा पईकर नावाचीही तोफ आहे. त्यामध्ये २ ते ३ तोफा इंग्रजांनी तयार केलेल्या असाव्या कारण त्यावरती इस्ट कंपनीचा लोगो आहे. आज हि या किल्ल्यात १५ ते २० तोफा धूळखात पडलेल्या आहेत.           ...

तिसरा डोळा.....!!👁️📷

Image
तिसरा डोळा.....!!👁️📷                  स्वतःला जे आवडत तेच करावं आणि मी पण तेच करायचा निर्णय घेतलाय, #होय_फोटोग्राफर_होतोय. स्वतःचा #छंद जोपासतोय. एक दोन वर्षांपूर्वी #सोम्यान फुटुचं याड लावलं, अन #ज्योत्यांन बरचसं मार्गदर्शन केलं. पण त्यावेळी #फोटोग्राफर वगैरे व्हावं अशी मुळीच इच्छा नव्हती, पण काल जूनच्या महिना अखेरीस मी जॉब करत असलेल्या एका खाजगी संस्थेतुन #पगारवाढ या कारणास्तव #स्वईच्छेने_राजीनामा दिला, कारण #नोकरी फक्त रोजच्या आयुष्यातल्या #गरजापूर्ण करते #स्वप्न नाही. तशी माझी स्वप्ने कमीच होती तरी देखील तेवढ्यात ती पूर्ण होऊच शकत नव्हती. म्हणून मन #स्वतःचा_व्यवसाय करावा या विचाराकडे वळल आणि #हितचिंतक_मित्रांनी मार्गदर्शन केलं. शिवाय घरचे ही सपोर्टला खंबीरपणे उभे आहेत, आणि शेवट पर्यंत राहतीलच. व्यवसाय करावा तर कुठला तेव्ह वाटलं स्वतःचा छंद आणि आवडीची गोष्ट करावी मनातून आवाज आला #फोटोग्राफर, स्वतःचा छंदच व्यवसाय म्हणून केला तर आयुष्याचा प्रवास सुखकर होईल. छंद + आवड + व्यवसाय = यशस्वी आयुष्य x स्वप्न         ...

#पावसा_येतोस_कि_नाही...!!🌧️💧⛈️

Image
"काय पोरा पाऊस पाडतोय का नाय औंदा।" (गाडी उभी करे पर्यन्त मीच विचारणार प्रश्न मलाच विचारला गेला.) "आशा ठिवन पण चुकीचं हाय बगा आता, चार महिन्यात पडला नाय तो आता काय पडणार मामा." (गाडी बंद करत करत.) "तरी पण समोरची तूर चांगली आलीय कि ओ." (गाडीवरून उतरून) "भारी रान हाय बबा ती." "दोन वर्ष चांगल गेलं अन या वर्षी अजून #दुष्काळ पडला. चार वर्षे दुष्काळात काढली बगा आमी." "कुठलं गाव म्हणायचं तुमचं." "आपलं वालवड." "होय, होय काढलं राव तुमी तेवढा तरास, बग कि नुसतं पंधराशिपाट आभाळ पडतंय कि रं."                           भयाण शांतता पसरली फक्त नाकाद्वारे घेत असलेल्या श्वासाचा आवाज कानी पडत होता. नेहमीच मी वयोवृद्ध माणसाला पावसाबद्दल पहिला प्रश्न विचारायचो पण त्यादिवशी एका वयोवृद्ध माणसाने मलाच तो प्रश्न विचारून बुचकळ्यात पाडलं. उत्तर नेमकं काय द्यावं हाच प्रश्न पडला. पण एक गोष्ठ कळली, गेल्या अनेक वर्षांपासून शेती करत असलेल्या शेतकऱ्याला आपल्या स्वानुभवाने पावसाचा अचूक अंदाज लागत होता, पण आता पावसाचा अंदा...

चंद्र....!!🌛🌚

Image
चंद्र.....!!🌛🌚            कृत्रिम प्रकाशापुढं तुझ्या सौन्दर्याकडे आमची चुकून देखील नजर जात नाही, आणि तू #ग्राहनात सुद्धा स्वतःच सौदर्य लपवत नाही. कधी अर्धा असतोस तर कधी पूर्ण. अमावसाच्या रातील नेहमीच तुझी गरज जाणवते. चंद्राचं आणि माझं जवळच नातं हे अगदी माझ्या लहानपणा पासूनच आहे. लहान असताना वडिलांना रात्री घरी यायला उशीर होयचा, अगदी मध्य रात्र सुद्धा, त्यावेळी लाईटीची देखील नियमित वेळ नसायची. उन्हाळ्याच्या दिवसांत मग तीन भावंडे, आई आम्ही सारे घरासमोरील पटांगणात बसायचो संपूर्ण गाव चंद्राच्या मंद प्रकाशात न्हाऊन निघायचं. हळूचं आईचं गाणं सुरु व्हायचं. "पौर्णिमाच पडलं चांदणं ताई तुला आलं मागणं, आईचं ऐक सांगणं सासुशी नीट वागणं।" "पौर्णिमाच पडलं चांदणं ताई तुला आलं मागणं, वडिलांच ऐक सांगणं सासऱ्याशी नीट वागणं।" "पौर्णिमाच पडलं चांदणं ताई तुला आलं मागणं, भावाचं एक सांगणं दिराशी नीट वागणं।" "पौर्णिमाच पडलं चांदणं ताई तुला आलं मागणं, बहिणीचं एक सांगणं नंदाशी नीट वागणं।" मच्छर बॅकग्राउंड म्युझिक द्यायला तयारच असायचे. अशा छोट्याश्या गाण्यामार्फत आम...

आपलं बाप्पा......!!

Image
आपल बाप्पा.......!!           दहा दिवसांसाठी आलेले बाप्पा विसर्जना दिवशी वाजत गाजत मिरवणुकीने  "पुढच्या वर्षी लवकर येईल" असं सांगून जातात. पण जाता-जाता आपल्या सर्वातला "मीपणा" आणि "जातीभेद" कायमचा काढून जातात. हो हे सत्यय आणि हे जर जाणून घ्यायचं असेल तर कधी या वालवडला आणि बगा #तुळजा_भवानी_गणेश_मंडळाकड आपो-आप लक्षात येईल सगळं. या मंडळाच्या वतीने गेल्या #बावीस वर्षांपासून गणेश उत्सव साजरा केला जातो. विसर्जना दिवशी शिरा आणि भाताचा प्रसाद घरो-घरी पोहोच केला जातो. लहानापासून ते वयस्कर लोकांपर्यन्त उत्सवात मोठ्या प्रमाणात भाग घेतात. तुळजा भवानी नगर मध्ये तरुण वयातील मुलांची सांख्य सरासरी विस ते पंचवीसच्या जवळपास आहे. परंतु अश्चर्याची गोष्ठ अशी की या संखेत पंधरा मुलांची संख्या मुस्लिम समाजातील आहेत. यातील बऱ्याच जणांना श्रींची आरती देखील तोंडपाठ आहे.               सकाळची आरती असो किंवा संध्याकाळची आम्ही सर्व जण आरतीला हजरच. आरतीच ताट करणे, बाप्पाचा जय घोष, आरती नंतर चुर्मुऱ्याचा प्रसाद वाटप असो किंवा आरती होत असताना #घंटी वाजव...

लोककला.....!!

Image
#लोककला ....!!                   महाराष्ट्राच्या मातीत गेल्या कित्येक दशकापासून #_लोककला एक उत्सवाप्रमाणे साजरी केली जातेय. लोककलेमार्फत #समाजप्रबोधनकार , #अन्याय , #अत्याचार , #महिला_सशक्तीकरण , #शेतकऱ्यांची_व्यथा , #राजकारण्यांचा_डावपेच #सुनेचा_छळ असे अनेक विविध प्रकारचे #नाटकांचे सादरीकरण करून, समाजात वावरणाऱ्या #क्रूर लोकांची आणि अन्याय, अत्याचार सहन करणाऱ्यांची मानसिकता बदलून, मनात #संघर्षाची भावना निर्माण करण्याचे काम केले, आणि आज ही #जय_भवानी_नाट्य_मंडळ_वालवड Android च्या जमान्यात हि करत आहेत.                    YouTube वर Motivation चे विडिओ पाहून, ऐकून अंगात #स्फूर्ती , #ऊर्जा निर्माण होत नसते, जरी झाली तरी ती #तात्पुरत्या वेळासाठी असते. #कायमस्वरूपी #स्फूर्ती , #ऊर्जा आणि #अन्याय विरुद्ध लढण्याची #हिम्मत कोठून येत असेल तर ते फक्त स्टेजच्या १० ते १५ फूट अंतरावर बसून #Live_लोककला पाहण्यात...

वालवड आठवडी बाजार.....!!

Image
वालवड आठवडी बाजार....!!            "आई मला नवीन वही, पेन घ्यायचाय."            "बरं बबा घेऊ सोमवारी."             छोट्यातून छोटी वस्तू गावात भेटत जरी असली तरी सोमवारची वाट पाहून घ्यावी लागते. कारण आठवडा भर शेतात केलेल्या कामाचा मोबदला/रोजगार सोमवारी घर पोहच मिळतो. लोकांचा अंतर्गत देवाण-घेवाणीचा व्यवहार सोमवारीच पूर्ण केला जातो. गेल्या कित्येक वर्षांपासून माझं वालवड गाव सोमवारी मोठ्ठा आठवडी बाजारगाव म्हणून पंचक्रोशीत #प्रसिद्ध आहे. कदाचित #उस्मानाबाद जिल्ह्यात #जनावरांचा सर्वांत मोठा बाजार वालवड मध्ये भरत असेल. उस्मानाबाद, बीड, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यातील मोठ-मोठे व्यापारी बैल, गाय, म्हैस, शेळी खरेदी, विक्रीसाठी येतात. लाखो रुपयांची उलाढाल या दिवशी होते. जनावरांचा बाजार #आनंद_बागेत भरतो. शेळीचा सकाळी ०७:०० ते १०:३० पर्यन्त गेट नं. ०२ आणि बैल, गाय, म्हैस यांचा स्वतंत्र ओळीत गेट नं.०१ समोर भरतो. #बाजाराचे_वैशिष्ठ्ये म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या दुकानांची एक #स्वतंत्र_गल्ली आहे. भाजी-पाला, कापड ...

रानमळा स्वर्ग.....!!

Image
#रानमळा_स्वर्ग                  पावसाळ्यात पाऊस पडल्यानंतर ओढे, नदी, नाले तुडुंब भरून वाहतात, त्यांचा होणार खळखळ आवाज एकूण मन कसे एकदम प्रसन्न होते.             एकीकडून ऐकू येणार पक्षांचा किलबिलाट, गाई वासरांचा हबरडा, थंडगार वारा, हेलिकॅप्टर सारख्या किड्यांची गरगर, छोट्या कीटकांची अन्न ग्रहण करून उद्यासाठी राहिलेलं अन्न सुरक्षित आपल्या बिळा पर्यंत नेण्याची घाई, रंगीबेरंगी फुलपाखरांची एका फुलावरून दुसऱ्या फुलावर आणि दुसऱ्या फुलावरून तिसऱ्या फुलावर बसण्याची शैर्यत आणि अचानक एक फुलपाखरू नकळत पणे हातावर येऊन बसल्याचा आनंद तर काही वेगळाच आणि अशातच कोणाच्या तरी आठवणीत रमून जाणे....!!😍😍 खूप वेळ आठवणीत रमल्या नंतर आठवणीतून परतण्याची इच्छा नसताना हि, अचानक सूर्याने स्वतःला ढगातून बाहेर काढून त्याचा कडक सूर्यप्रकाश डोळ्यावर पाडून आठवणीतून बाहेर काढाव,😬😬 नंतर लक्ष जावं ते शेतातील डौलाने नाचत असणारे सूर्यफूल आणि तुर पिकांकडे, हे हिरवेगार पीक शेतकऱ्यांच्या मनाला थोडीशी अशा दाखवत उडिद आणि सोयाबीन पिकाचे झालेले नुकसान या...