#पावसा_येतोस_कि_नाही...!!🌧️💧⛈️
"काय पोरा पाऊस पाडतोय का नाय औंदा।"
(गाडी उभी करे पर्यन्त मीच विचारणार प्रश्न मलाच विचारला गेला.)
"आशा ठिवन पण चुकीचं हाय बगा आता, चार महिन्यात पडला नाय तो आता काय पडणार मामा."
(गाडी बंद करत करत.)
"तरी पण समोरची तूर चांगली आलीय कि ओ." (गाडीवरून उतरून)
"भारी रान हाय बबा ती."
"दोन वर्ष चांगल गेलं अन या वर्षी अजून #दुष्काळ पडला. चार वर्षे दुष्काळात काढली बगा आमी."
"कुठलं गाव म्हणायचं तुमचं."
"आपलं वालवड."
"होय, होय काढलं राव तुमी तेवढा तरास, बग कि नुसतं पंधराशिपाट आभाळ पडतंय कि रं."
भयाण शांतता पसरली फक्त नाकाद्वारे घेत असलेल्या श्वासाचा आवाज कानी पडत होता. नेहमीच मी वयोवृद्ध माणसाला पावसाबद्दल पहिला प्रश्न विचारायचो पण त्यादिवशी एका वयोवृद्ध माणसाने मलाच तो प्रश्न विचारून बुचकळ्यात पाडलं. उत्तर नेमकं काय द्यावं हाच प्रश्न पडला. पण एक गोष्ठ कळली, गेल्या अनेक वर्षांपासून शेती करत असलेल्या शेतकऱ्याला आपल्या स्वानुभवाने पावसाचा अचूक अंदाज लागत होता, पण आता पावसाचा अंदाज देखील लावणं चुकीचं आहे. कारण जेव्हा जेव्हा अंदाज लावला जातोय तेव्हा तेव्हा पाऊस धोका देऊन निघून जातोय.
आभाळ भरून येतात, गडगडतात, विजा होतात, सुसाट्याचा वारा सुटतोय, पण एक थेंब हि जमिनीची तहान भागवण्यासाठी पडत नाही. अतृप्त धरती आकाशाला साकडं घालून घालून, आणि आम्ही शेतकरी आशेने डोळे वर करून करून धकलोय.
#पावसा_येतोस_कि_नाही...!!🌧️💧⛈️
दि.०५।ऑक्टोबर।२०१८
-© Ajim Shafik Tamboli🖋️

Comments
Post a Comment