Posts

Showing posts from 2020

किती हि भयाण शांतता, 😱😨😢

Image
किती हि भयाण शांतता, 😱😨😢       अशी जीवघेणी शांतता या आधी कधीच वालवडमध्ये पसरली नसेल. निम्म्या रात्री जरी उठलो तरी "जय जय राम कृष्ण हरी" नावाचा जप, पहाटेच्या साखर झोपेत जरी असलो ना, तरी "फजर" च्या नामजची आजान अलगद कानी पडायची, सरकारी दवाखान्याकडून कावळ्यांची "काव-काव" पहाटेची सुंदर स्वप्न मोडून काढायची. माणसांनी, गाड्यांनी, समानांनी गच्च भरलेली दुकान मोठ्ठालट #स्टँड आज #तळहाता एवढाच भासतोय, एरवी गजबजणारा बाजार तब्बल आठ दिवस झालं #ओस_पडलाय. १० फूट उभा असणाऱ्या मित्राला ओरडून सांगितलं तरी ऐकू जात नव्हती, अन आज साधं बोललं तरी तो आवज १०० फूट उभा असणारा व्यक्ती स्पष्ठ ऐकतोय. #हि_शांतता_सहन_होत_नाहीये.😢          मस्जिद मध्ये नमाज पठन करण्यासाठी गेल्यावर मौलवी बयान (कीर्तन समजा) करताना सांगायचे "कयामत (महामारी) आनेवाली हैं" तुम्ही चांगलं काम करा "माणुसकी जपा". तेव्हा त्या गोष्टी खरं वाटत नव्हत्या. म्हातारी लोक पण सांगायची आमच्या वेळेस "प्लेग" रोग अल्ता. एकाची माती करुस्तर दुसरं मारायचं. भविष्यात प्लेग सारखी महामारी येईल ...

सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा २०२०

Image
"७००० ते ८००० च्या आसपास लोकं अस्त्याल का रं तुमच्या विवाह सोहळ्याला" "हा आठ लग्न म्हणल्यावर कदाचित तेवढ वऱ्हाड येणारच ना, हा पण तुमचा विवाह सोहळा अस बोलू नको"🤗 "का रं"🤔 "सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचा आयोजन कर्ते जरी शिवसंकल्प प्रतिष्ठान असला ना तरी त्या विवाह सोहळयात झटलेले प्रत्येक हात हे #आम्हा_वालवडकरांचेच होते."💪😍 "हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला." "नाय नाय नाय आमच्या मनाचा मोठेपणा नाही, तर हा #आम्हा_वालवडकरांच्या विचारांचा मोठेपणाय."🤗🤓 "खरंय लका तुमी सगळेच चांगलं काम करता."😊 "धन्यवाद."🙏😍            आपल्या घरात जर १० मानस आली तर आपली धांदल उडते की आता कस करू, काय करू जेवण बनवू का? च्या देऊ, का? गरम गरम नास्ता देऊ, अश्यावेळी काहीच सुधरत नाही. पण जेव्हा एक सोबत १००० पेक्षा जास्त लोक एकाच वेळी, जेवायला बसत अस्तिय तर..... काय कल्पना करताय, कदाचित कल्पनेच्या हि पलीकडं असावं, असं म्हणता येईल कारण गावातलं मंडळ म्हणलं की गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, किंवा महापुरुषांच्या जयंती न...