किती हि भयाण शांतता, 😱😨😢
किती हि भयाण शांतता, 😱😨😢
अशी जीवघेणी शांतता या आधी कधीच वालवडमध्ये पसरली नसेल. निम्म्या रात्री जरी उठलो तरी "जय जय राम कृष्ण हरी" नावाचा जप, पहाटेच्या साखर झोपेत जरी असलो ना, तरी "फजर" च्या नामजची आजान अलगद कानी पडायची, सरकारी दवाखान्याकडून कावळ्यांची "काव-काव" पहाटेची सुंदर स्वप्न मोडून काढायची. माणसांनी, गाड्यांनी, समानांनी गच्च भरलेली दुकान मोठ्ठालट #स्टँड आज #तळहाता एवढाच भासतोय, एरवी गजबजणारा बाजार तब्बल आठ दिवस झालं #ओस_पडलाय. १० फूट उभा असणाऱ्या मित्राला ओरडून सांगितलं तरी ऐकू जात नव्हती, अन आज साधं बोललं तरी तो आवज १०० फूट उभा असणारा व्यक्ती स्पष्ठ ऐकतोय. #हि_शांतता_सहन_होत_नाहीये.😢
मस्जिद मध्ये नमाज पठन करण्यासाठी गेल्यावर मौलवी बयान (कीर्तन समजा) करताना सांगायचे "कयामत (महामारी) आनेवाली हैं" तुम्ही चांगलं काम करा "माणुसकी जपा". तेव्हा त्या गोष्टी खरं वाटत नव्हत्या. म्हातारी लोक पण सांगायची आमच्या वेळेस "प्लेग" रोग अल्ता. एकाची माती करुस्तर दुसरं मारायचं. भविष्यात प्लेग सारखी महामारी येईल याची कल्पना पण करत नव्हतो पण #कोरोनांन पूर्ण जगभरात थैमान घातलंय.
पण आपल्याला आपल्या आज्या-पंज्यानी #प्लेग बद्दल जस सांगितलं तस सांगायची बारी आपल्याला आपल्या येणाऱ्या पिढ्यांना येणार नाही, उलट पूर्ण जग #कोरोनाच्या (COVID 19) विळख्यात सापडलय परंतु #भारत देशात त्याला पाय पसरू दिले नाहीत हे आपल्याला गर्वाने सांगायचंय.
अन त्याचसाठी जो पर्यंत #कोरोना नावाचा असूर नष्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला घरातच राहायचंय,
सतत हात साबणाने स्वच्छ धुवायचेत अन
शिंकतांना, खोकताना तोंड रुमालाने झाकायचय अन आता आपल्याला या लढ्यातून जिंकायचय....!!👍
#WeWillWin
#SteyHome
#Corona
#COVID19

Comments
Post a Comment