शेतकऱ्यांची फौज....!!
शेतकऱ्यांची फौज....!!
हम्ब्याssssssss
हम्ब्याssssssss
हंबरण्याचा अलार्म ऐकू आला कि नचुकता किंवा नियमित वेळेत उठून पहिलं आपल्या #जित्राबाचा गोठा गाठणार शेतकरी किती काष्ठाळू आणि प्रेमळ असतो हे घर बसल्या खुर्चीवर आयता गरमा-गरम चहा, दूध, कॉफी पिताना कधीच लक्षात येणार नाही. तांबडं फुटायच्या अगोदरच त्यांची दिवसाच्या कामाची सुरुवात होते. गाई, म्हशींची धार (दूध) काढायची, मोकळ्या हवेत बांधायची, वैरण, पाणी करायची, गोठा साफ करायचा च्या पिऊन रतीबाची दूध घरपोच करायची. चलता-चलता बाजारातल्या गप्पा ऐकायच्या अन मग घरी येऊन, गरम-गरम #न्यारी करून. एका फाटक्या चिंधीत दुपारची भाकर घ्यायची अन जित्राबा घेऊन #तडक शेतात निघायचं. हिंस्त्र प्राण्यांपासून जित्राबाच संरक्षण व्हावं यासाठी #कुत्र्याला सोबत घेऊन माळ रानात आपली अन आपल्या जनावरांची पोटाची खळगी भरण्यासाठी फिरणारे कित्येक शेतकरी आपण रोज पाहतो.
पावसाळयात जेव्हा जोराचा पाऊस, सोसाट्याचा वारा अन जोर-जोरात वीज कडाडते तेव्हा आपण स्लॅबच्या खोलीत बसलेलो असलो ना तरी भीतीने मनाचे पाणी पाणी होत, तेव्हा हाच शेतकरी मोकळ्या माळरानात एक बांधाच्या कोपऱ्याला प्लास्टिकच घोघट घेऊन आपल्या जित्राबासोबत तटस्थ बसलेला असतो याची थोडीशी पण जाणीव आपल्याला नसते. (त्यांच्या घरचे माणसं सोडता) असा भयानक नजारा डोळ्या समोर चालू असून देखील तो क्विंचित हि घाबरलेला नसतो, या उलट त्याचा आनंद गगनात न मावणारा असतो. याच आनंदाने थंडीने काकडलेल्या आपल्या जित्राबा सोबत घराच्या दिशेने मार्गस्थ होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी बाजारात पाऊस कुठं कमी, कुठं ज्यास्त झाला याची चर्चा मोठ्या अभिमानाने आणि आनंदाने सांगत सुटतो......!!
#बळीराजा सुखी तर सगळे सुखी।
दि.०३।जुलै।२०१८
Ajim Shafik Tamboli ✍️

Comments
Post a Comment