दरोडा....!!
#दरोडा.....!!
आज तब्बल आठ घर लुटून, हजारो मधमाश्याना बेघर केलं, परंतु त्या मधमाश्यानी हार न मानता पुन्हा तात्काळ त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवर आपल घर बनवायला सुरुवात केली. कारण संघर्ष इथं कधीच संपत नाही. सभोवतालच्या निसर्गात अनंत प्राणी, पक्षी वावरतात ज्यांना संघर्षाचे धडे आईच्या उदरातच मिळतात. हिसकावून खाणं आणि आपल्या हातातलं हिसकावल तर युद्ध करून ते परत मिळवण्याचा प्रयत्न करणे, नाहीच तर पुन्हा नव्याने सुरुवात. नदी, ओढा, नाला, झाड-झुडपं, बांध, या सगळ्यातून पायपीट केली तेव्हा पाच जण पाच #मव्हाळ घेऊन आलो. तीन जाग्यावरच फोडली. बाकी मी ओझ्यानच मेलो पाणी बॉटल, शेणाचीगौरी, कोयता, आणि छोटी बकेट "अर्रर्रर्रर्र इथं एक मव्हाळ हाय, लय मोठय या लवकर." बाबा ओरडला कि हे सगळं एका हातात सांभाळून नेणं लै अवघड, कारण दुसऱ्या हातात एक मव्हाळ होतं.
दत्ता, सचिनदादा, बाबा, अन नंदू झाडावर चडून गौरीच्या(शेणाची) धुराद्वारे मधमाश्याना उठवून #मध अलगद खाली घेऊन येत होते, आणि त्याच बरोबर "कांदा (मध) कमीचंय जरा." दादाची लगेच न विचारताच येणारी प्रतिक्रिया हि. 😂😂😂
बाकी "काळी चिमणी घावाय पाहिजे हुती राव।" (फँड्रीतली)😑😔
२०१९ पण फेल जातंय काय कि.....!!😂😂😂
दि. ०५।जानेवारी।२०१९
© Ajim Shafik Tamboli 🖋️

Comments
Post a Comment