सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न....!!
दि. १२ जानेवारी २०१८ रोजी जिजाऊ जन्मोत्सव निमित्त सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला..!! दिप प्रज्वलन करून माँ.जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला. मराठा क्रांती मोर्चा राज्यव्यापी समिती सदस्या पूजाताई मोरे आणि प्रा.विशाल गरडसर यांनी शिवसंकल्प प्रतिष्ठान वालवडने आजपर्यंत केलेले सामाजिक उपक्रम वऱ्हाडी मंडळींसमोर मांडले त्यानंतर देवबाप्पा कडे माईक देऊन लग्न विधी पूर्ण करण्यास मुभा दिली. तीन जोडपे लग्नाच्या बंधनात जन्मोजन्मसाठी अडकली.
स्वतः नावरदेवा सहित ५३ रक्तदात्यांनी आपल्या अनमोल रक्ताची आहुती दिली.
नव वधु-वारांस शुभ आशीर्वाद देण्या करता. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले मा.सुजीतसिंह ठाकूर, संजय गाढवे, प्रतापसिंह पाटील, सुरेश कांबळे, मा. शहाजी चव्हाण, प्रवीण खटाळ, आदम शेख, दत्ता मोहिते, जालिंदर मोहिते, श्रीहरी बरस्कर दिग्गज राजकीय नेत्यांनी हि हजेरी लावली. त्याच बरोबर वऱ्हाडी मंडळींनी हि शुभ आशीर्वाद दिला.
गेल्या दोन महिन्यांन पासून विवाह सोहळ्याची तयारी करत असलेले प्रतिष्ठानचे पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज दिसत होते, दोन दिवस पूर्ण रात्रभर स्वयंपाक करण्यासाठी झालेले जागरण आणि त्यात आणखीन दिवसभरातील कामाचा व्याप इतका होता की जेवण करण्यास हि वेळ नव्हता एवढं सगळं असून देखील कोणाच्याही चेहऱ्यावर थकवा, मरगळ नव्हती. प्रत्येक जण आपल्यावर जबाबदारीने सोपवलेली कामे व्यवस्तीत पूर्ण करून. "ते काम पूर्ण झालं बरं का." हे एकूण त्यांच्यात एक वेगळेच समाधान दिसायचे म्हणजे आता त्यांना दुसरी जबाबदारी स्वीकारायची होती आणि ती जबाबदारी पण व्यवस्तीत पार पाडण्यात एक आनंदच मिळत. या सोहळ्यात अनमोल सहकार्य मिळाले ते गावातील महिलावर्गाचा लग्नाच्या रात्री गावातील सर्व महिलावर्गानी ०३ क्विंटलच्या चपात्या एकाच तासात सम्पवल्या त्या पण भाजनातील गाण्याने प्रत्येकि एक महिलेच्या वाटणीला एक ते दिड किलो पिठ आले असेल. वाडेकरू मंडळी आपले सर्वांचे आभार....!!
।या सर्व राबलेल्या हातांचे खूप खूप आभार। अशीच साथ शेवट पर्यंत सोबत असू द्या हि विनंती।
धन्यवाद...!!🙏🙏🙏
दि.१३।जानेवारी।२०१८
© Ajim Shafik Tamboli

Comments
Post a Comment